Sangli News : वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून हाणामारी

परस्परविरोधी तक्रार; तेरा जणांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

तासगाव : शहरातील वरचे गल्ली येथे वहिवाटीच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी तासगाव पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून एकुण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राकेश धनाजी पाटील (वय ३२, रा. वरचे गल्ली, तासगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल महादेव पाटील, महादेव आनंदराव पाटील, सुभाष आनंदराव पाटील, शरद सुभाष पाटील, शुभम दशरथ पाटील (सर्व रा. वरचे गल्ली, तासगाव) यांच्याविरोधात तर विशाल महादेव पाटील यांच्या फिर्यादीवरून विजय बाळासाहेब पाटील, अमित श्रीकांत पाटील, गणेश मारुती पाटील, श्रीकांत मारुती पाटील, अमोल रामचंद्र पाटील, सदाशिव गोविंद पाटील, रुपेश धनाजती पाटील, राकेश धनाजी पाटील (सर्व रा. वरचे गल्ली, तासगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गटांमध्ये वहिवाटीच्या रस्त्यावरून न्यायप्रविष्ठ वाद सुरू आहे. याची धुसफूस दोन्ही गटात होती. दरम्यान यातून किरकोळ वादातून हे दोन्ही गट समोरासमोर आले व एकमेकांना मारहाण करू लागले. यामध्ये सदाशिव पाटील व अमित पाटील यांच्या डोक्यात गजाने व काठीने मारहाण केल्याने तर महादेव पाटील व सुभाष पाटील यांनाही रॉडने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान यामध्ये सुभाष पाटील यांच्या गळ्यातील चेन गहाळ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news