Sangli News : शहरातील बहुतांशी पेट्रोल पंप बंद

कंपन्याकडून कमी पुरवठा; पंपासमोर रांगा
Petrol Pump
शहरातील बहुतांशी पेट्रोल पंप बंद
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल पेट्रोल पंपाची परस्थिती गुरुवारी जैसे थे राहिली. जिल्ह्यातील 256 पैकी जवळपास 60 टक्के पेट्रोल पंप बंद राहिले. सांगली शहरातील केवळ तीन, चार पंपच दिवसभर सुरु होते. याठिकाणी वाहन धारकांनी मोठी गर्दी केली होती. मागणी नोंदवूनही चार दिवसापासून पुरवठा झाला नसल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली.

सांगलीतील बसस्थानक रोड, स्टेशन चौक, तरुण भारत क्रीडांगण, मार्केट यार्ड आदी परिसरातील पेट्रोल पंप बंद होते. विश्रामबाग चौक, माधवनगर रोडवरील काही पंप सुरु होते. याठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुरू असलेल्या पंपावर वाहनधारक अधिक प्रमाणात इंधन भरताना दिसत होते.

सांगली जिल्ह्यात 21 मे रोजी पेट्रोलचा 2515 किलोलिटर, डिझेल 2870 किलोलिटर तर एलपीजीचा 1264.2 टन साठा शिल्लक असून 96.6 टन एलपीजी येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पुरवठा अधिकारी आशिष फुलूके यांनी दिली.

जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1305 किलोलिटर, बीपीसीएलचा 690 किलोलिटर व एचपीसीएलचा 520 किलोलिटर असा एकूण 2515 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1420 किलोलिटर, बीपीसीएलचा 810 किलोलिटर व एचपीसीएलचा 640 किलोलिटर असा एकूण 2870 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 1096 टन, आयओसीएलचा 55 टन व बीपीसीएलचा 113.2 टन असा एकूण 1264.2 टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 96.6 टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news