Sangli Crime News : बालविवाहातून अपत्यप्राप्ती; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पतीसह नातलगांचा समावेश : संजयनगर पोलिसांत नोंद
Sangli Crime News |
Sangli Crime News : बालविवाहातून अपत्यप्राप्ती; चौघांविरोधात गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

सांगली : अल्पवयीन मुलीचा विवाह करून देणार्‍या नातेवाईकासह पतीविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. याप्रकरणी महिला हवालदार शैलजा गावडे यांनी फिर्याद दिली. बलात्कार, सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली.

पीडित मुलगी अल्पवयीन असून तिने शासकीय रुग्णालयात नुकताच एका अपत्याला जन्म दिला. डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी चौकशी केली असता पीडित मुलीचा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले. पीडितेचे दि. 14 जुलै 2024 रोजी लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. पोलिसांनी पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news