Sangli Political News : मी उबाठा मध्येच उभा आहे, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांचे स्पष्टीकरण

त्‍यांचा मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न
Chandrahar Patil
मी उबाठा मध्येच उभा आहे, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटीलFile Photo
Published on
Updated on

Sangli Chandrahar Patil News

विटा : विजय लाळे

मी उबाठा मध्येच उभा आहे. माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. अशांचा बंदोबस्त लवकरच करणार, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा संघटक, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.

शिवसेना सांगली जिल्हा संघटक, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुडाळमध्ये एकत्र पंक्तीला बसून जेवण घेतले. त्यानंतर परवा गुरुवारी पै. चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केवळ चंद्रहार पाटील यांच्यासाठीच सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी पंगा घेतला होता. पण आता हेच पै. चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती, त्यावर आता खुद्द चंद्रहार पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, "आपण सोशल मीडियावरती पोस्ट लिहून यापूर्वीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही अकारण माझ्याबाबतच्या बातम्या कशा चालविल्या जात आहेत. हे मलाच समजत नाही. मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो होतो. सध्याचे शिंदेंच्या शिवसेनेत असलेले मंत्री उदय सामंत हे आपले पहिल्यापासूनचे मित्र आहेत. त्यांनी मला जेवायला बोलावले होते. तिथे आमच्यात राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आले. एकनाथ शिंदे तिथे येणार आहेत हे मला बिल्कूल माहिती नव्हते. तेथून मी १५ ते २० मिनिटात बाहेर पडलो.

या वेळी काहीही राजकीय चर्चा झाली नाही, परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न म्हणून मीडियात खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूंचा लवकरच बंदोबस्त मी करणार आहे आणि ते जनतेला पाहायलाही मिळेल.

दरम्यान, सोशल मीडियामध्ये लिहिलेल्या आणखी एका पोस्टमध्ये चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे की, "राजकीय डावपेचापेक्षा, ज्या क्रीडा क्षेत्राने मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. राज्‍याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काहीही गैर वाटत नाही. याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news