Sangli News : सांगली महापालिकेच्या नगररचना शाखा अभियंत्यांवर गुन्हा

कुपवाड कार्यालयात अधिकाराचा गैरवापर करून अनियमितता केल्याचा ठपका
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on: 
Updated on: 

कुपवाड : कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या नगररचना विभागातील शाखा अभियंत्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी असतानाही प्रस्ताव मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शाखा अभियंत्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाबाज रहीम शेख (वय ३५, रा. सांगली) असे संशयित शाखा अभियंत्याचे नाव आहे. महापालिकेच्या प्रभारी नगररचनाकार पूजा सतीश महाजन यांनी याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाबाज शेख हा महापालिकेच्या कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या नगररचना विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याच्या कामकाजाबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन शेख याच्या कारभाराची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान दि. ९ ऑगस्ट २०२६ ते १६ ऑक्टोबरदरम्यान प्रभाग क्रमांक आठमधील जागेचे गुंठेवारी नियमितीकरणाच्या संदर्भातील शासकीय मूळ फाइल (रजिस्ट्रेशन नंबर २४३, हिस्सा क्रमांक दोन) कार्यालयात उपलब्ध नसणे, तसेच दुय्यम कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी असतानाही प्रस्ताव मंजूर करणे अशा गंभीर प्रशासकीय चुका आढळल्या.

चौकशीत शाखा अभियंता शहाबाज शेख दोषी आढळल्याने तसा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. आयुक्तांच्या आदेशानुसार कुपवाड पोलिस ठाण्यात शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news