Sangli Accident : बस-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुणाचा मृत्यू

बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक
 Accident News
Accident News pudhari photo
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील कनफ मळा परिसरात एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. शंकर रंगराव चौगुले (वय ३६, रा. मोघमवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर चौगुले हे शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून (एमएच १० बीपी ६०४१) कवठेमहांकाळहून अग्रण धुळगावकडे जात होते. या दरम्यान समोरून येणाऱ्या एसटी बसची (एमएच १३ सीयू ७४६०) व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चौगुले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू असून कवठेमहांकाळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news