Sangli Crime:घरफोड्या करणारा जेरबंद; 7 वर्षांपासून होता फरार

वाळवा तालुक्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन ऊर्फ गुंड्या दारासिंग पवार या संशयिताला तासगाव पोलिसांनी अटक केली.
Sangli Crime:घरफोड्या करणारा जेरबंद; 7 वर्षांपासून होता फरार
Published on
Updated on

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन ऊर्फ गुंड्या दारासिंग पवार (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) या संशयिताला तासगाव पोलिसांनी अटक केली. गुंड्या हा गेल्या सहा वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी तासगाव येथील इंदिरानगरमध्ये ही कारवाई केली.

तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये काही लोकांत वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निरीक्षक विशाल टकले आणि पथकाने तेथे धाव घेतली. तेथील वाद मिटवून संबंधितांची चौकशी सुरू केली. त्यावेळी वादावादीमध्ये सामील असलेल्या गुंड्या याची चौकशी केली, त्यावेळी गुंड्याविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात घरफोडीसह अन्य गुन्हा आणि सन 2020 मध्ये कासेगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

कासेगाव पोलिसांच्या ताब्यात

तासगाव पोलिसांनी घरफोडीप्रकरणी गुंड्या याला ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर कासेगाव पोलिसांनी कासेगाव हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यात गुंड्या याला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी गुंड्या याने जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news