Sangli Crime : बंटी-बबलीला 7 दिवस पोलिस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेकडून ताबा : आणखी कारनामे उघड होणार
Sangli Crime News
बंटी-बबलीला 7 दिवस पोलिस कोठडी
Published on
Updated on

सांगली : क्रिप्टो करन्सी, जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय 51) व जस्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (वय 41, रा. गुरूवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या बंटी-बबलीच्या जोडीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यात रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून इब्राहिम नायकवडी, त्याचा भाऊ अब्दुलमहंमदसाब नायकवडी, इब्राहिमची पत्नी जास्मिन नायकवडी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिघांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकदारांची तब्बल 2 कोटी 15 लाख 55 हजारांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले होते. या प्रकरणात अब्दुल नायकवडी याला पोलिसांनी अटक केली होती. परंतू इब्राहिम व जास्मिन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती.

इब्राहिम व जास्मिन यांनी त्यानंतर सांगलीतील अशोक मासाळे यांच्या श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सल्टंट या फर्मकडे जागा विकसित करण्यासाठी करार केला होता. त्यासाठी रक्कम घेतली होती. परंतू प्रत्यक्षात करार पूर्ण न करता मासाळे यांची 36 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. मासाळे यांनी पैसे परत मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जास्मिन हिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. अखेर मासाळे यांनी गुन्हा दाखल केला. तसेच नायकवडी दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून ‌‘ॲट्रॉसिटी‌’चा गुन्हा दाखल केला. कारवाईच्या भीतीने हे दांपत्य चार वर्षापासून फरार होते विश्रामबाग पोलिसांनी त्यांना गोवा येथून ताब्यात घेतले.

मिरज पोलिसांकडून दांपत्याची बडदास्त?

पाच वर्षापासून बंटी-बबली हे दांपत्य फरार होते. त्यांनी घेतलेल्या पैशामुळे अनेक जण उघड्यावर आले आहेत. यामधील तक्रारदार माशाळे यांनी पोलिसांना मदत केल्यानंतर गोवा येथे पकडण्यात पोलिसांना यश आले. मिरज पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची बडदास्त ठेवल्याची चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news