

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडून डीजेचा दणदणाट करणाऱ्या बुधगाव (ता. मिरज) येथील दोन गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे मालक व ऑपरेटर यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
योगेश्वर गणेशोत्सव मंडळ आणि व्यंकटराव अण्णा पाटील मंडळ यांनी विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर केला होता. यावेळी पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले.
याप्रकरणी योगेश्वर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिषेक रवी पाटील, उपाध्यक्ष आकाश लक्ष्मण पोतदार, सदस्य बसाप्पा मल्लिकार्जुन कानगौड, विकास बाळासाहेब देसाई, आकाश लक्ष्मण पवळकर (सर्व रा. बुधगाव) यांच्यासह जय शंकर ऑडिओचे मालक यश दत्तात्रय नराळे (रा. भवानी पेठ, पुणे) व ऑपरेटर प्रथमेश प्रशांत शिंदे (रा. कॅम्प, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच व्यंकटराव अण्णा पाटील मंडळाचे अध्यक्ष राहुल राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष उमेश नागेश पाटील, सदस्य सुदर्शन नारायण पाटील, प्रशांतज सिद्धेश्वर पाटील, शक्तिशील मनोहर पाटील, राजेंद्र वसंत शिंदे (सर्व रा. बुधगाव), डीजे मालक सद्दामहुसेन सिराज आंबेकर (रा. वारजे फाटा, कराड), ऑपरेटर ऋषी विलास कदम (रा. मांगले, ता. शिराळा) आणि ट्रॅक्टर चालक रणजित विलास पाटील (रा. बुधगाव) यांच्यावरही सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.