

सांगली : शहरातील कत्तलखान्याजवळ आणि मिरज तालुक्यातील बुधगाव येथे सुरू असणार्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. याप्रकरणी शिराज फरदिन पाथरवट (वय 55, रा. सांगली), फारूख मुजावर (रा. गणेशनगर, सांगली) आणि इम्रान रियाज जमादार (वय 42, रा. खणभाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. तिघांकडून 6 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिराज आणि फारूक हे दोघे सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात जुगार अड्डे चालवत होते, तर इम्रान हा बुधगावमध्ये जुगार अड्डा चालवत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली.
परंतु शहरासह मिरज पश्चिम भागातील अनेक गावांत खुलेआम जुगार अड्डे सुरू आहेत. सांगलीत शहरात तर रस्त्यावर असणार्या टपर्यांमध्ये जुगार अड्डा चालविला जातो. नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या, परंतु त्यावर कारवाई होत नाही. शहरातील अन्य जुगार अड्ड्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे.