Sangli Crime : भावासह बहिणीला पोलिस कोठडी

गुप्तांग पिरगाळून जिवे मारल्याचा आरोप; आटपाडीतील घटना
Sangli Crime News
भावासह बहिणीला पोलिस कोठडी
Published on
Updated on

आटपाडी : आटपाडीतील गोरडवस्ती येथे आप्पा नाथा अनुसे (वय ४३) यांना काठीने मारहाण करून खाली पाडल्यानंतर गुप्तांग पिरगाळून जिवे मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मृताचा भाऊ धुळदेव नाथा अनुसे (४०), बहीण संगीता सुखदेव कोळेकर (४५) आणि आई पारूबाई नाथा अनुसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धुळदेव व संगीता यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

८ सप्टेंबररोजी रात्री गोरडवस्ती येथे संशयितांच्या घरासमोर हा प्रकार घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. आप्पा अनुसे यांच्याशी वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. धुळदेव याने काठीने, तर संगीता व पारूबाई यांनी हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आप्पा खाली पडल्यानंतरही धुळदेव याने त्यांचे गुप्तांग जोराने पिरगाळून दाबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून रात्रीच अंत्यविधी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, मृताचे मावसभाऊ बापूराव रामचंद्र व्हनमाने यांनी या प्रकाराबाबत सतर्कता दाखवत पोलिसांत फिर्याद दिल्याने प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, काल त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news