Jat youth murder case: बिळूरच्या तरुणाचा जतजवळ दगडाने ठेचून खून

मल्लाळ रस्त्यावर घटना : शेतजमिनीच्या वादाचे कारण
Crime News
Murder Case Pudhari
Published on
Updated on

जत : जत तालुक्यातील बिळूर येथील तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले. जत बिळूर रोडवरील मल्याळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. श्रीधर निमगोंडा येडगोंड (वय 40, रा. बिळूर, ता. जत ) असे मृताचे नाव आहे. हा खून जमीन वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व नातेवाईकांकडून व्यक्त झाला.

संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झालेले आहेत. बिळूर गावात येलगोंड कुटुंबाची शंभर एकर जमीन आहे. येडगोंड आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये काही वर्षांपासून जमीन व सामाईक विहिरीच्या प्रश्नावरून वाद सुरू होता. या वादाबाबत पोलिस आणि महसूल विभागात तक्रारीही दाखल असल्याची माहिती मिळाली.

सोमवारी या वादावर तोडगा काढण्यासाठी संबंधित कुटुंबीय जत शहरात आले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने येडगोंड सायंकाळी मोटरसायकलवरून बिळूर गावाकडे निघाले होते. दरम्यान, मल्याळ रस्त्यावर त्यांना अडवून अज्ञातांनी यक्तींनी दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर जखमा झाल्या. त्यांचे दोन्ही पायही मोडले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news