Sangli News : बिळाशीतील वृद्धाची आठ लाखांची फसवणूक

जुन्या नोटांच्या बदल्यात ५७ लाखांचे आमिष
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

कोकरूड : जुन्या चलनी नोटांना मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखवून बिळाशी (ता. शिराळा) येथील वृद्धाची तब्बल ८ लाख १ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान महादेव पाटील (वय ६२, रा. बिळाशी) यांच्या मोबाईलवर १६ जुलै ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत समाजमाध्यमावर एका अनोळखी क्रमांकावरून ‘ओल्ड कॉईन कंपनी’चे नाव प्रसारित झाले होते. त्यांनी शेवटी ७८६ अंक असलेल्या नोटांच्या बदल्यात मोठा मोबदला मिळेल, असे जाहीर केले होेते. त्यानंतर पाटील यांनी त्यांच्याजवळील २००, १०० व १० रुपयांच्‍या ७८६ क्रमांकाने शेवट होणाऱ्या नोटांचे फोटो संबंधित क्रमांकावर पाठवले. त्यानंतर एका व्यक्तीने ‘ओल्ड कॉईन कंपनी’मधून बोलत असल्याचे सांगून या नोटांच्या बदल्यात ५७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर विविध कारणे सांगून पाटील यांच्याकडून वेळोवेळी मोबाईल स्कॅनरद्वारे एकूण ८ लाख १ हजार ५०० रुपये घेतले; मात्र आश्वासनात दिलेली मोबदला रक्कम न देता आणखी पैसे भरण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पैसे न दिल्यास इजा करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news