Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

विटा-रेणावी रस्त्यावरील घटना
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

विटा : विटा-रेणावी रस्त्यावरील रेणावी घाटातील पहिल्या वळणावर मोटार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. राहुल सिद्धेश्वर गुरव (वय ३५, रा. रेणावी) असे मृताचे नाव आहे. त्यांचे मित्र नीलेश पाटील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणावी येथील राहुल गुरव आणि त्यांचे मित्र नीलेश पाटील हे दोघे दुचाकीवरून (क्र. एमएच १० एपी ०४६२) रेणावी येथून विटा येथे कामासाठी जात होते. रेणावी घाटातील सिमेंट काँक्रीटच्या वळणावर ते आले असता, समोरून विट्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीच्या (क्र. एमपी ०९ सीयू ८४०१) चालकाने आपली बाजू सोडून थेट चुकीच्या बाजूला गाडी आणली व त्याने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नीलेश पाटील यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्या उजव्या डोळ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्यासोबत असलेले राहुल गुरव यांच्या डोक्याला, छातीला, पायाला गंभीर मार लागला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी नीलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक मनीष नरेंद्र मुळीक याच्याविरोधात विटा पोलिसात भारतीय न्यायसंहिता, तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news