

कवठेमहांकाळ : जत - कवठेमहांकाळ मार्गावरील लिंबेवाडी (रांजणी) फाट्याजवळ दुचाकी (एम. एच. 10, डी. एच. 1727) व कार (एम. एच 10, बी.ए.9678) यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. शंकर संभाजी एडके (वय 40, वासुंबे, ता. तासगाव) व अन्य एकजण (नाव समजले नाही) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
तासगाव तालुक्यातील काही लोक कारमधून जतकडून कवठेमहांकाळच्या दिशेने निघाले होते. दुचाकीवरील दोघे मजूर हे कवठेमहांकाळकडून जतकडे निघाले होते. लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला. दुचाकीवरील एकजण ठार झाला, तर कारमधील एकजण ठार झाला. दरम्यान पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा नोंद करण्याचे काम पोलिसांत सुरू होते.