Sangli Crime : बेवनूर येथे आर्थिक वादातून तरुणास बेदम मारहाण

जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangli Crime News
बेवनूर येथे आर्थिक वादातून तरुणास बेदम मारहाण Pudhari File Photo
Published on
Updated on

जत : बेवनूर (ता. जत) येथे उसने पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणास पट्टा व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 मार्चरोजी रात्री 9 वाजता घडली.

याबाबत दिगंबर मारुती काळेल (वय 27, व्यवसाय शेती, रा. कायल वस्ती, बेवनूर, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव सीताराम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेवनूर येथील कलवाल मळा परिसरात फिर्यादी दिगंबर काळेल हे घराकडे जात असताना संशयित महादेव शिंदे याने त्यांच्याकडे उसने पैसे देण्याची मागणी केली. काळेल यांनी पैसे नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या महादेव याने त्यांना जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कमरेचा पट्टा काढून पाठीवर व गळ्यावर फटके मारले. दरम्यान, काळेल यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने दगड घेऊन त्यांच्या डोक्यात व डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली. यामध्ये काळेल गंभीर जखमी झाले. घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक निरीक्षक गोडसे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news