

वाळवा : येथील सोन्याचे दागिने तयार करणारा बंगाली कारागीर लियाकत अली ऊर्फ संटू बंगाली हा सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी सुमारे 15 लाखाची माया घेऊन फरार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की एस. के. लियाकत अली या नावाचा बंगाली कारागीर सराफांकडून सोने घेऊन त्याचे दागिने तयार करून देत होता. त्याची त्याला मजुरी मिळत होती. सराफ ग्राहकांकडून भरपूर मजुरी घेत होते, त्यामुळे लियाकत अली सोने घेऊन त्याचे लोकांना मागणीप्रमाणे दागिने तयार करून देऊ लागला. बर्याच लोकांनी ते तयार करून घेतले. लोकांचा त्याने विश्वास मिळवला. काहींनी त्याला उधार, उसनवार पैसेही दिले. लोक हळूहळू अडकत गेले, दरम्यान दुकानातील सर्व साहित्य घेऊन तो कधी पसार झाला कोणालाच कळले नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यामुळे संशय अधिकच बळकट झाल्यामुळे त्याच्या दुकानाच्या ठिकाणी काहीही नसल्याचे आढळून आल्यामुळे गावभर याची चर्चा झाली. सर्वत्र अक्षरशः खळबळ उडाली आहे. सुमारे 15 लाखाची फसवणूक झाली असून अद्यापपर्यंत आष्टा पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.