Sangli News : बलगवडे कब्रस्तानात भानामतीचा प्रकार

लिंबांवर स्थानिक नेत्यांची नावे लिहून सुई टोचल्याने खळबळ
Sangli News
बलगवडे कब्रस्तानात भानामतीचा प्रकार
Published on
Updated on

मांजर्डे : बलगवडे (ता. तासगाव) येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान परिसरात लिंबांवर गावातील अनेक व्यक्तींची नावे लिहून त्यामध्ये सुया टोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास २० ते ३० लिंबांवर स्थानिक नेत्यांची नावे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी गावातील काही तरुण कब्रस्तान परिसरात स्वच्छतेसाठी गेले असता, हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी पाहिले असता लिंबांवर गावातील प्र मुख कार्यकर्त्यांची व नेत्यांची नावे लिहून त्यात सुया टोचल्याचे दिसले. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आणि पवित्र ठिकाणी असा प्रकार घडल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला, की यामागे काही वेगळा उद्देश आहे, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करावी आणि गावातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हा भानामतीसारखा प्रकार असून कोणी तरी मांत्रिकाकडून करणी केलेले लिंबू आणून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.
- राहुल थोरात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तासगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news