Sangli Crime : बागणीतील विवाहितेचा नदीत बुडून मृत्यू

आष्टा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
drowning news
Raigad News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मोरबे धरणात बुडून मृत्यूFile photo
Published on
Updated on

आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथील 34 वर्षीय विवाहितेचा बागणी-शिगाव हद्दीतील नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपाली संतोष ठाकूर असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 5 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत रूपाली ठाकूर या बागणी-शिगाव हद्दीतील नदीपात्रात पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना तत्काळ आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. घोंगडे यांनी घोषित केले. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून आष्टा पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news