Sangli Crime : आटपाडीत शेतकऱ्यावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

काठ्यांनी, दगडफेक करून बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा
Crime
Crime
Published on: 
Updated on: 

आटपाडी : काळेवाडी (ता. आटपाडी) येथील बागलवस्ती परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर तलवार, काठ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवार, ८ ऑक्टोबररोजी सकाळी ९.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी जखमी झाला आहे. याप्रकरणी समाधान ज्ञानू दबडे याच्यासह सात जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आनंदा दामू बागल (वय ४६, रा. बागलवस्ती, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी आनंदा बागल हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी मोटारीतून समाधान दबडे व तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अनोळखी व्यक्ती, तसेच चार दुचाकींवरून तोंडाला रुमाल बांधलेले अन्य हल्लेखोर तेथे दाखल झाले.

संशयितांनी बागल यांना काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या अंगावर धारदार शस्त्र फेकून हातात तलवार घेऊन पाठलाग केला. शेतातील महिला कामगारांनी आरडाओरडा केल्यावर बागल यांच्या घरातील नातेवाईक व इतर कामगार मदतीसाठी धावून आले. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने हल्लेखोर त्यांची मोटार व एक दुचाकी घटनास्थळीच सोडून पसार झाले.

दरम्यान, जखमी बागल उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जात असताना संशयितांनी बागल व त्यांच्या तीन भावांचे मोबाईलवर फोटो काढून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news