Sangli Crime : डुकरांना पळवून नेल्याच्या वादातून कोयत्याने वार

जत शहरात हाणामारी; दोन वाहनांची तोडफोड
Sangli Crime News
डुकरांना पळवून नेल्याच्या वादातून कोयत्याने वारFile Photo
Published on
Updated on

जत : पाळलेल्या डुकरांना पळवून नेल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी पाच जणांनी शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केल्याची घटना जत शहरातील स्टील कॉलनी, उमराणी रोड परिसरात शुक्रवारी (दि. ४) रात्री घडली.

या प्रकरणी सुरेश शिवाप्पा कोळी ( २६, व्यवसाय भंगार दुकान, रा. स्टील कॉलनी, उमराणी रोड, जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास अशोक बनपट्टे, अक्षय अशोक बनपट्टे, सागर राम पाथरुट, सांदीप राम पाथरुट आणि महेश पाथरुट (सर्व रा. जत) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर पाळलेले डुक्कर पळवून नेल्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींपैकी एकाने ‘तू कशाला मध्ये बोलतोस, आता तुला जिवे ठारच मारतो,’ असे म्हणत हातातील कोयत्याने फिर्यादीच्या कपाळावर वार केला. या हल्ल्यात सुरेश कोळी जखमी झाले. तसेच एका आरोपीने सुकांप्पा कोळी यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांनाही जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादींची टाटा सफारी (एमएच-१० ए.एन-४८००) तसेच दुसरी टाटा सफारी (एमएच-१४ बी.आर-११७६) या दोन्ही वाहनांवर लाकडी दांडके व कोयत्याने वार करून काचा फोडल्या. वाहनांचे नुकसान करून आरोपी तेथून निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news