Madgyal Sheep GI Tag | आटपाडी तालुक्यातील माडग्याळ मेंढीला GI टॅग मिळणार; केंद्रीय शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी

प्रसिद्ध माडग्याळ मेंढीला भौगोलिक मानांकन (GI टॅग) मिळवून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला
Atpadi Taluka Madgyal Mendhi
शास्त्रज्ञांनी तालुक्यातील विविध भागांत भेटी देत माडग्याळ मेंढीची सखोल पाहणी केली.Pudhari
Published on
Updated on

Atpadi Taluka Madgyal Mendhi

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध माडग्याळ मेंढीला भौगोलिक मानांकन (GI टॅग) मिळवून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) आणि केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यातील विविध भागांत भेटी देत माडग्याळ मेंढीची सखोल पाहणी केली.

शास्त्रज्ञांच्या पथकाने शेगदरमळा, पुजारवाडी आणि जांभूळणी येथील मेंढीपालकांच्या शेडना भेट देऊन माडग्याळ मेंढीची शारीरिक वैशिष्ट्ये, अनुवंशिक गुणधर्म, पालनपद्धती तसेच स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा अभ्यास केला.

Atpadi Taluka Madgyal Mendhi
Atpadi Accident |पात्रेवाडी जवळ पिकअप- दुचाकीचा अपघात, तळेवाडीतील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

या समितीत ICAR-NBAGR करनालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. महेश दिघे, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था, अविकानगर (राजस्थान) येथील डॉ. सारवनन, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. टेकाडे, डॉ. सचिन दडस आणि डॉ. पोपट कारंडे यांचा समावेश होता.

यावेळी पुजारवाडीचे बाजार समिती सभापती संतोष पुजारी, शेगदरमळा येथील सोमनाथ जाधव (माळी) आणि जांभूळणी येथील दाजीशेठ थोरात यांच्या शेडमधील मेंढ्यांची विशेष तपासणी करण्यात आली.

डॉ. एस.बी. गाढवे, डॉ. ए.टी. चव्हाण आणि डॉ. एस.डी. चांगण यांनी माडग्याळ मेंढीच्या जातीची वैशिष्ट्ये, मजबूत शरीरयष्टी, रोगप्रतिकारशक्ती, लांब पल्ल्याच्या स्थलांतराची क्षमता आणि वाढत्या तापमानात टिकून राहण्याच्या गुणधर्मांविषयी माहिती दिली.

Atpadi Taluka Madgyal Mendhi
Atpadi Crime : आटपाडीत चांदीचे 28 लाखांचे दागिने जप्त

दुष्काळी परिस्थितीतही सहज तग धरणारी, कमी खर्चात पालन करता येणारी आणि चविष्ट मटणासाठी राज्याबाहेरही मोठी मागणी असलेली माडग्याळ मेंढी ही राज्यातील महत्त्वाची देशी जात मानली जाते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

यावेळी संतोष पुजारी यांनी माडग्याळ मेंढीपालन ग्रामीण युवकांसाठी रोजगार व आर्थिक स्थैर्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे सांगत सुशिक्षित तरुणांनी आधुनिक पद्धतीने मेंढीपालनाकडे वळावे, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news