Sangli ATM Theft : एटीएम फोडून पाच लाखांची चोरी

कवठेएकंदमध्ये मध्यरात्री घटना
ATM Theft
ATM Theft Pudhari
Published on: 
Updated on: 

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एसटी स्टँड परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर आणि अन्य हत्यारांच्या सहाय्याने फोडले. एटीएममधील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी (दि. १८) मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला असून, गुरुवार, दि. १९ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही चोरी उघडकीस आली.

कवठेएकंद येथील वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात हे एटीएम आहे. गुरुवारी सकाळपासूनच एटीएमचे शटर बंद होते. त्यामुळे हा प्रकार बराच वेळ कोणाच्याही लक्षात आला नाही. अखेर दुपारी एकच्या सुमारास एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक यादव, पोलिस निरीक्षक विशाल टकले आणि पोलिस उपनिरीक्षक दीपक पाटील आदींसह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तासगाव पोलिसांसह तज्ज्ञ पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.