Sangli Accident : आष्टा-वडगाव रस्त्यावर मालवाहू टेम्पोची दुचाकीला धडक

पती-पत्नी गंभीर जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावरील बिरोबा मंदिरासमोर भरधाव मालवाहू टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. 10 मे रोजी सायंकाळी घडला. आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रदीप विलासराव पाटील (वय 60) व नंदा प्रदीप पाटील (रा. पोखर्णी, ता. वाळवा) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत, तर अभिजित माने (पूर्ण नाव माहिती नाही, रा. आष्टा, ता. वाळवा) असे संशयित टेम्पो चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप पाटील हे पत्नी नंदा यांच्यासह रविवार दि. 10 मे रोजी सायंकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच 10 बीएच 8026) जात होते. आष्टा-वडगाव रस्त्यावरील बिरोबा मंदिरासमोर ते आले असता, पाठीमागून आलेल्या टेम्पोच्या (क्र. एमएच 10 सीआर 3236) चालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेमुळे पाटील दाम्पत्य रस्त्यावर पडले. यामध्ये प्रदीप पाटील यांना दुखापत झाली, तसेच त्यांच्या पत्नी नंदा पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news