Sangli Crime : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Financial Fraud
Financial Fraud(file photo)
Published on: 
Updated on: 

आष्टा : ऊसतोड व भरणीसाठी मजूर पुरवतो असे सांगून एकाची ३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविराज अशोक शिंगटे (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संदीप शंकर सावंत (वय ४४, रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अविराज शिंगटे याने २०२४-२५ या गळित हंगामासाठी ऊसतोडणी व भरणीकरिता एकूण ६ ऊसजोड्या पुरवतो असे सांगून फिर्यादी संदीप सावंत यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मजुरांच्या उचल रकमेपोटी त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले.

मात्र, ठरल्याप्रमाणे ना ऊसतोड मजूर पुरवले ना घेतलेले पैसे परत केले. अशा प्रकारे आपली ३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संदीप सावंत यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, आष्टा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news