Sangli Leopard Attack: आष्ट्यात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

सर्वोदय सहकारी साखर कारखाना मार्गावरील अडतूर वाट परिसरात रविवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शुभम ढोले यांचा घोडा जागीच ठार
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

​आष्टा : येथील सर्वोदय सहकारी साखर कारखाना मार्गावरील अडतूर वाट परिसरात रविवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शुभम ढोले यांचा घोडा जागीच ठार झाला. या घटनेमुळे आष्टा शहरासह परिसरातील मळे भागात खळबळ उडाली असून नागरिक व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

गेल्या चार दिवसांत या परिसरात बिबट्याने काही भटक्या कुत्र्यांचाही शिकार केला आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी धनाजी ढोले यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परिसरात शोधमोहीम राबवली होती. तसेच गेल्या महिन्यात हालुडे मळा व लाळगे मळा परिसरात बिबट्याच्या पावलांचे स्पष्ट ठसे आढळून आले होते. कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सदाशिव दळवी यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची तीन नवजात पिलेही आढळून आली होती.

गेल्या काही दिवसांपासून आष्टा शहर व परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने आढळत आहे. घोडा ठार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मळे भागात राहणाऱ्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना हातात बॅटरी, काठी सोबत ठेवावी आणि सतर्क राहावे. बिबट्याचा वावर दिसून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news