Sangli Crime : आष्ट्यात ज्यूस सेंटर चालकावर खुनीहल्ला

सांडपाणी उडाल्याच्या कारणावरून घटना
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

आष्टा : येथील बसस्थानक परिसरातील सोडा क्लब अँड ज्यूस सेंटरसमोर सांडपाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून ज्यूस सेंटर चालकावर सहाजणांनी मिळून हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर (वय 30, रा. महालक्ष्मी बेकरीमागे, आष्टा) असे जखमीचे नाव आहे, तर सूरज संताजी पाटील, योगेश संताजी पाटील (दोघेही रा. शिगाव, ता. वाळवा) आणि इतर चार अनोळखी अशी संशयितांची नावे आहेत. ऋषिकेश कांडगावकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर हे 6 मे रोजी सायंकाळी 7.10 वाजण्याच्या सुमारास आपल्या ज्यूस सेंटरसमोरील जागा पाण्याने धुवत होते. यावेळी साचलेले सांडपाणी शेजारीच असलेल्या सावकार अमृततुल्य चहा या दुकानासमोर गेल्याच्या कारणावरून योगेश संताजी पाटील याने ऋषिकेश यांच्याशी वाद घातला व शिविगाळ केली. वादानंतर योगेश याने आपला भाऊ सूरज संताजी पाटील याला बोलावून घेतले. या दोघांनी ऋषिकेश यांना पुन्हा शिविगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी सूरज पाटील याने आपल्याजवळील चाकूसारख्या धारदार शस्त्राने ऋषिकेश यांच्या तोंडावर व नाकावर सपासप वार केले, तर योगेश पाटील याने हातातील वायरने ऋषिकेश यांच्या पाठीवर व गालावर मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार अनोळखी व्यक्तींनी ऋषिकेश यांना शिविगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी ऋषिकेश यांच्या फिर्यादीवरून वरील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news