Sangli News : बाजार समिती सभापतीपदी नलावडे?

बहुतेक नेते, संचालकांचा पाठिंबा : आज विशेष सर्वसाधारण सभा
Sangli Market Committee
बाजार समिती सभापतीपदी नलावडे?
Published on
Updated on

सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी आज-गुरुवार, दि. 5 रोजी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील बहुतेक नेते व बाजार समिती संचालकांचा संचालक आनंदराव नलावडे यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. रिक्त झालेल्या पदावर गुरुवारी निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत हे पद काँग्रेसकडे होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिले जाणार आहे. त्यामुळे या पक्षाचे आनंदराव नलावडे की महेश पवार सभापती होणार, याची उत्सुकता लागलेली आहे.

बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे जास्त संचालक असल्याने पावणेतीन वर्षांपूर्वी सुजय शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीवेळी कसबे डिग्रज गटातून आनंदराव नलावडे यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सभापती बदलाबाबत घडामोडी घडल्या. सभापती शिंदे यांचा राजीनामा खासदार विशाल पाटील यांनी घेतला. त्यानंतर नलावडे यांचा अर्ज निवडणुकीतून काढून घेण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रे उमेदवाराचा विजय झाला.

खासदार पाटील यांच्याकडून आनंदराव नलावडे यांनी हे राजीनामा पत्र घेतले. ते जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांच्याकडे सादर केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सभापती निवडीचा कार्यक्रम लावला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता नवीन निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत जत तालुक्याला संधी मिळाली आहे. उपसभापतीपद कवठेमंकाळ तालुक्याकडे आहे. त्यामुळे यावेळी मिरज तालुक्याला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला यापूर्वी संधी मिळाल्याने आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या पदासाठी दावेदारी करण्यात येत आहे. आनंदराव नलावडे यांनी पुढाकार घेऊन शिंदे यांना राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर आता ते या पदासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. ते आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. त्याशिवाय आता मिरज तालुक्यास संधी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीतील बहुतेक नेते व संचालकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news