सांगली : पारंपरिक शेती वेगाने बदलते आहे. शेतीतही नवीन प्रयोग होत आहेत. नवीन तंत्र, अत्याधुनिक मशिनरी आली आहे. शेतीपूरक व्यवसाय, नवीन खते, नवीन बियाणे, पाणी नियोजनाचे नवे तंत्र रुजायला लागले आहे. शेतीतले हे बदल शेतकऱ्यांनाही बदलायला लावत आहेत. नव्याची उत्सुकता, नवे रुजवायची हिंमत युवा शेतकऱ्यांच्या नजरेत दिसते आहे. ‘पुढारी ॲग्रीपंढरी’मध्ये येणाऱ्या शेकडो युवा शेतकऱ्यांना या नव्या तंत्राचे गमक गवसल्याची भावना व्यक्त होते आहे. या प्रदर्शनाची आज, सोमवारी सांगता होते आहे.
दै. ‘पुढारी’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुढारी ॲग््राीपंढरी’चा आजचा रविवार प्रचंड गर्दीचा ठरला. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही शेकडो शेतकरी आपली मित्रमंडळी आणि कुटुंबासह हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. काल दिवसभर ही ॲग्रीपंढरी बळीराजाच्या प्रचंड सहभागाने गजबजून गेली होती. प्रदर्शनात मांडण्यात आलेली शेतीविषयक माहिती आणि साधनांचे सर्व स्टॉल्स काल फुल्ल होते. या स्टॉल्सवर जाऊन शेतकरी नव्या तंत्राची, साधनांची,खते-औषधे आणि बियाणांची माहिती घेत होते. युवा शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. स्टॉल्ससोबत हिरव्यागार भाज्या, बहरलेल्या पालेभाज्या आणि मनासोबत आर्थिक समाधानही देणाऱ्या फुलांचे प्लॉट्स बघून शेतकऱ्यांना वेगळाच आत्मविश्वास येत होता. प्रदर्शन परिसरात 75 पेक्षा जास्त प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फुलांचे प्लॉट्स शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत होते. अवघ्या दोन महिन्यात आलेली ही भरघोस पिके पाहता पाहताच त्या त्या पिकांची, त्यासाठी वापरलेल्या नव्या तंत्रांची, औषधांची सारी माहिती या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मिळत असल्याने त्यांच्यात समाधान दिसत होते.
ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिएंट्स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून अ हेवन हॉलिडेज् हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. बी. जी. चितळे डेअरी आणि कन्हैया ॲग्रो हे सहप्रायोजक आहेत, तर सोनरूपम जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे गिफ्ट पार्टनर आहेत. प्रदर्शनास राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.
प्रदर्शनाची खास आकर्षणे...
लाईव्ह क्रॉप डेमो : शेतात प्रत्यक्ष उभी पिके पाहून विक्रमी उत्पादनाचे ‘गुपित’ जाणून घेण्याची संधी.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात जास्त
उत्पादन घेण्याचे तंत्र तज्ज्ञांकडून थेट शिकता येईल.
प्रदर्शन : औषधे, दर्जेदार बी-बियाणे आणि अत्याधुनिक शेती अवजारांचे शेकडो स्टॉल्स एकाच छताखाली.
अधिक माहितीसाठी ः 9545327545.
शेतकऱ्यांना काय मिळणार?
हमखास गिफ्ट : प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 1500 रुपयांचे हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे.
माती, पाण्याचे नमुने घेऊन यावे : ‘ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्यूट्रिएंट’कडून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत माती आणि पाणी परीक्षण करून देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी येताना माती आणि पाण्याचे नमुने घेऊन यायचे आहेत.
वेळ आणि ठिकाण...
दिनांक : शुक्रवार, दि. 20
ते सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 7.00
ठिकाण : विलिंग्डन कॉलेज कंपाऊंड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय परिसर.