

कुपवाड : सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून दहशत माजविणाऱ्या 10 संशयितांवर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी पहाटे करण्यात आली.
चिंतामणी चंद्रकांत कांबळे (रा. यशवंतनगर, कुपवाड), समीर मोहब्बत पठाण (रा. हनुमाननगर कवलापूर, सध्या रा. कुपवाड), बाबासाहेब ऊर्फ बाब्या संपत दुधाळ, अमीर बाबाजी मगदूम, शकील सरदार मगदूम, सुशांत सुनील आवळे, ज्ञानेश्वर गणपती पाटील, प्रशांत सुनील आवळे, रोहन गणपती पाटील (सर्व रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज), उमर समीर शेख (रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कुपवाड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी पहाटे कुपवाड गावठाण, रामकृष्णनगर, अहिल्यानगर, प्रकाशनगर, कापसे प्लॉट, अवधूत कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, दत्तनगर बामणोली आदी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले. काही तरुण सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून परिसरामध्ये दहशत माजवित आहेत, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता 10 संशयित तरुण पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.