Sangli Accident : उंबरगाव पाटीजवळ भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू

मोटारीची दुचाकीला धडक, चालक फरार
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

आटपाडी : दिघंची-पंढरपूर मार्गावर उंबरगाव (ता. आटपाडी) पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. 22 फेब्रुवारीरोजी सायंकाळी घडली. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्यांचा सोमवार, दि. 23 फेब्रुवारीरोजी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत उंबरगाव येथील किशोर नामदेव शिवगारे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 फेब्रुवारीरोजी सायंकाळी सुमारे 6.15 वाजण्याच्या सुमारास दिघंचीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उंबरगाव पाटीजवळ ही दुर्घटना घडली.

फिर्यादीचे वडील रामचंद्र श्रीपती शिनगारे (वय 70, रा. ता. आटपाडी, जि. सांगली) हे दुचाकीवरून (एमएच 12 सीडब्ल्यू 5378) घरी जात असताना दिघंचीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीने (एमएच 46 डीए 9904) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोटार चालकाने जखमींना मदत न करता पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी शिनगारे यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दि. 23 फेब्रुवारीरोजी रात्री सुमारे 7.45 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news