Sangli Accident : बेळंकीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनधारकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशाल धोंडिराम भंडारे (वय २६, रा. टाकळी, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विशाल भंडारे हे बेळंकी येथे एका हॉटेलमध्ये कामास होते. ते दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता हॉटेलमधील काम आटोपून टाकळीकडे येत होते. यावेळी बेळंकी ते शिपूरदरम्यान असणाऱ्या गंगाटेक येथे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने विशाल भंडारे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.