Sangli Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

आटपाडी : भिंगेवाडी (ता. आटपाडी) येथे भरधाव मोटारीने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात बाळेवाडी येथील दादा विठोबा खरात (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृत दादा खरात यांची पत्नी सुनीता खरात (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटार चालक वैभव नागनाथ भोसले (रा. चिकमहुद, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दादा खरात हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएफ ४७७५) आटपाडीहून भिंगेवाडीमार्गे बाळेवाडीकडे जात होते. ते भिंगेवाडी येथील कृषी विद्यालयाजवळ आले असता समोरून आलेल्या मोटारीने (क्र. एमएच ४५ बीएच ०४४०) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

अपघातात दादा खरात यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. चालकाने भरधाव वेगाने, अत्यंत निष्काळजीपणे तसेच विरुद्ध दिशेने मोटार चालवून हा अपघात घडविल्याचा आरोप फिर्यादी सुनीता खरात यांनी केला आहे. याप्रकरणी सोमवार, दि. २८ रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news