Sangli Accident| विट्यात भरधाव बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बस चालकावर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangli Accident|
विट्यात भरधाव बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

विटा : विटा ते कराड मार्गावर भरधाव बसने दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. १८ रोजी सुमारास घडली. अंजली राजेश जाधव (वय २८, रा. लक्ष्मीनगर, विटा) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विशाल बबन जाधव यांच्या फिर्यादीवरून बस चालक बाळकृष्ण ज्ञानदेव निकम (वय ३१, रा. खंबाळे-औंध, ता. कडेगाव) याच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी पहाटे कराड-विटा रस्त्यावरून अंजली जाधव या पायी चालत निघाल्या होत्या. भाळवणी फाट्याजवळ कराडहून विट्याकडे वेगाने येणाऱ्या विटा आगाराच्या बसने (एमएच १०, बीटी २८९७) त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात अंजली जाधव यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.