Sangli Accident : मोटार टेम्पोखाली घुसली; तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेळकेवाडीजवळील घटना
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

नागज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेळकेवाडीजवळ (ता. कवठेमहांकाळ) भरधाव मोटार पाठीमागून टेम्पोखाली घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात गुंडेवाडी (ता. मिरज) येथील अजय बाजीराव गडदे (वय ३१) याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सीएनजी घेऊन टेम्पो (क्र. एमएच ११ डीडी २७४२) सांगलीहून जतच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, त्याच दिशेने पाठीमागून येणाऱ्या भरधाव मोटारीने (क्र. एमएच १२ केजे २३०३) टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीचा निम्म्याहून अधिक भाग टेम्पोखाली घुसला. अपघातात मोटारीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये मोटारचालक अजय बाजीराव गडदे (रा. बेंदवस्ती, एरंडोली रस्ता, गुंडेवाडी, ता. मिरज) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या घटनेची नोंद करून कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news