Sangli Accident : कासेगावात दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
Sangli Accident : कासेगावात दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

कासेगाव : कासेगाव ते कराड जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर डांबरमिश्रित खडीचा ढिगारा ठेवून सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने झालेल्या अपघातात बहे (ता. वाळवा) येथील लालासाहेब भगवान मोहिते (वय ५१) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबररोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कासेगावच्या हद्दीतील साई हॉटेलपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर कासेगाव ते कराड जाणाऱ्या सेवा रस्त्यावर हा अपघात घडला. लालासाहेब मोहिते हे दुचाकीवरून कराडच्या दिशेने चालले होते. रस्त्याच्या मध्यभागी डांबरमिश्रित खडीचा ढिगारा टाकण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने चालकांना इशारा देणारे कोणतेही फलक किंवा सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे अंधारात मोहिते यांची दुचाकी खडीच्या ढिगाऱ्यावर घसरली.

अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातास रस्त्याचे काम करणारा ठेकेदार कारणीभूत असल्याची फिर्याद उत्तम संपतराव मोहिते (वय ५४, रा. बहे, ता. वाळवा) यांनी दिली. त्यावरून कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news