

कडेगाव शहर : कडेगाव-कराड मार्गावर खंबाळे-औंध येथील दत्त मंदिराजवळ दुचाकी व पिकअपच्या धडकेत आर्यन राजेश शिंगण (वय १७, रा. कडेगाव) या युवकाचा मृत्यू झाला. अपघातात आर्यन याचा मित्र यश अमोल देशमुख हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी वाहन चालक नवनाथ तुकाराम बंदपट्टे (मूळ रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. सुरली) याच्याविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवार, दि. १० रोजी सकाळी घडली. याबाबत राजेश विठ्ठल शिंगण यांनी फिर्याद दिली.
आर्यन हा मित्र यश याच्यासह इलेक्ट्रिक दुचाकीवरुन (एम एच ५०, झेड ००६६) कराडकडे जात होता. खंबाळे-औंध येथील दत्त मंदिराजवळ नवनाथ हा पिकअप (क्र. एमएच ५०, एम ७३००) घेऊन वेगाने येत होता. अपघातात आर्यन याचा जागीच मृत्यू झाला, तर यश गंभीर जखमी झाला आहे.