

कोकरुड : कराड-शेडगेवाडी रस्त्यावर येळापूर (ता. शिराळा) येथे मॉर्निंग वॉकवरून परतताना माजी सरपंच जयवंत काशिनाथ कडोले (वय 46) यांना मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
मोटारीतील संजय सीताराम मोरे (वय 54 ), अंकिता संजय मोरे (वय 39), स्नेहल संजय मोरे (वय 17), आर्या संजय मोरे (वय 14), कनिष्का संजय मोरे (वय 11), सारस संजय मोरे (वय 9, सर्व रा. अंबरनाथ पश्चिम कल्याण, जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले. बुधवारी सकाळी हा अपघात घडला. मोटार चालक परशुराम अनिल नकवाल (वय 42, रा. अंबरनाथ, कल्याण, ठाणे) याच्याविरोधात कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परशुराम हा मोटारीतून (एमएच 04, डीएच 0369) अंबरनाथहून प्रवासी घेऊन भूईबावडा (ता. राजापूर) येथे निघाला होता. येळापूरनजीक त्याने माजी सरपंच जयवंत कडोले यांना जोराची धडक दिली. डोक्याला, छातीला गंभीर मार लागल्याने कडोले यांचा जागीच मृत्यू झाला.