Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बागणी येथील घटना; मोटारचालक नसलापूरचा
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथे मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात इक्बाल उरमानगणी मुल्ला (वय ७५, रा. बागणी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बागणी-आष्टा मार्गावरील सरकारी रुग्णालयासमोर असलेल्या रॉयल चायनीज हॉटेलसमोर घडला.

याप्रकरणी अब्दुलकादीर इक्बाल मुल्ला (वय ४०, सध्या रा. कल्याण, मुंबई; मूळ रा. बागणी) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाहुबली अण्णासाहेब सखोबारे (रा. पलूस, मूळ रा. नसलापूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक मोटार (क्र. एमएच १२ डीव्ही ६९५४) घेऊन जात असताना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालवले. या मोटारीने इक्बाल मुल्ला यांच्या दुचाकीस (क्र. एमएच १० डीएक्स १९७१) पाठीमागून धडक दिली. या अपघातात मुल्ला यांच्या डोक्याला, कमरेच्या उजव्या बाजूला, डाव्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवार, दि. २१ रोजी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयित वाहनचालक अद्याप फरार आहे. आष्टा पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.