

मिरज : टाकळी (ता. मिरज) येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक झाल्याने एकजण ठार झाला. विश्वनाथ कल्लाप्पा आगाजे (वय 60, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. अपघातात दुचाकीचालक विश्वास हरिबा जैन (वय 60, रा. चंदूर, इचलकरंजी) जखमी झाले. मंगळवार, दि. 13 रोजी सकाळी हा अपघात घडला. दुचाकीचालक विश्वास जैन याच्यासह अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विश्वनाथ आगाजे आणि विश्वास जैन हे दोघे दुचाकीवरून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. सकाळी टाकळी येथे त्यांच्या दुचाकीची एका अज्ञात वाहनाला धडक बसली. अपघातात दुचाकी चालविणारे विश्वास जैन जखमी झाले, तर दुचाकीवर मागे बसलेले विश्वनाथ आगाजे यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विश्वनाथ आगाजे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक विश्वास जैन आणि अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.