Sangli Accident : दिघंचीजवळ मोटारीस धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दिघंची-पंढरपूर मार्गावरील दडसवाडी फाट्याजवळ भरधाव दुचाकीने आलिशान मोटारीस पाठीमागून जोरदार धडक दिली
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

आटपाडी : दिघंची-पंढरपूर मार्गावरील दडसवाडी फाट्याजवळ भरधाव दुचाकीने आलिशान मोटारीस पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत पंढरी उगलमोगले (रा. ईश्वरपूर, मूळ रा. इडापिडा, ता. भूम, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विकास विलास कदम (वय ४३, रा. कौठोळी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कदम हे त्यांच्या मोटारीतून (क्र. केएल ५८ एए ०५५५) दिघंची-पंढरपूर मार्गाने लांडा महादेव मंदिराकडे जात होते. दडसवाडी फाट्याजवळ त्यांनी मोटार वळवून रस्त्याच्या खाली घेतली. त्याचवेळी पंढरपूरकडून येणाऱ्या दुचाकीवरील (क्र. एमएच १० एएल ०५४६) चालक भागवत उगलमोगले यांनी गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालवून मोटारीच्या मागे डाव्या बाजूस जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार उगलमोगले हे गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कदम यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तक्रार देण्यास व गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news