Sangli Accident : टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पडवळवाडी फाट्यावर अपघात; एक गंभीर
Accident
AccidentFile Photo
Published on
Updated on

​आष्टा : आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावर पडवळवाडी फाट्याजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला दुचाकीने मागून धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आष्टा येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.

राजेंद्र नामदेव वीरभक्त (वय ३५, रा. आष्टा, ता. वाळवा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे; तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले योगेश पांडुरंग खंदारे (वय ४२, रा. आष्टा) हे गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत विशाल रवींद्र पवार (वय ४१, रा. जावडेकर चौक, ईश्वरपूर) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टेम्पो चालक नफिज रफिक खान (रा. शाही बाग, खजराना कनाडिया, इंदूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजेंद्र वीरभक्त हे आपले मित्र योगेश खंदारे यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएम ३५०८) ईश्वरपूरहून आष्टा येथे येत होते. पडवळवाडी फाट्याजवळ शहाजी खोत यांच्या घरासमोर गंजीखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मुख्य रस्त्यावर टेम्पो (क्र. एमपी ०९ जीएच ९७८६) उभा होता. चालक नफिज खान याने टेम्पो वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभा केल्याचा आरोप आहे.

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभा असलेला टेम्पो न दिसल्याने दुचाकीची त्यास मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचालक राजेंद्र वीरभक्त हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले योगेश खंदारे यांच्या डाव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news