Sangli Accident : दुचाकीची कंटेनरला धडक; बिळाशी येथील एकाचा मृत्यू

एक गंभीर जखमी
Sangli Accident |
Sangli Accident : दुचाकीची कंटेनरला धडक; बिळाशी येथील एकाचा मृत्यू (File Photo)
Published on
Updated on

कोकरूड : रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असणारे संतोष वासुदेव शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद बोरगाव (जि. सातारा) पोलिस ठाण्यात करण्यात आली.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बिळाशी येथील संतोष वासुदेव शिंदे (वय 40) हेे दत्तात्रय आनंदा पाटील (वय 40) या मित्राला सोबत घेऊन दुचाकी (एमएच 10 / 1053) वरून शेंद्रे (जि. सातारा) येथे सासुरवाडीला जात होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास काशीळ फाट्याच्या पुढे रॉयल हॉटेलसमोर उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये दुचाकीचालक दत्तात्रय पाटील व संतोष शिंदे या दोघांनाही डोक्यास गंगीर दुखापत झाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून दोघांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सातारा येथे नेले. पण जाताना वाटेतच दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांना खासगी रुग्णालया दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news