Sangli Accident: कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकल्याने पोलिसपुत्राचा मृत्यू

मृत कोल्हापूरचा : पोलिस जखमी; तानंग फाटा येथे अपघात
Sangli Accident: कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकल्याने पोलिसपुत्राचा मृत्यू
Published on
Updated on

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तानंग फाटा (ता. मिरज) येथे कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकल्याने पोलिसपुत्राचा मृत्यू झाला. हरिप्रसाद संताजी चव्हाण (18, रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

अपघातात त्याचे वडील कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी संताजी शीलवंत चव्हाण (49, रा. कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले संताजी चव्हाण हे त्यांचा मुलगा हरिप्रसाद चव्हाण याच्यासह कवठेमहांकाळ येथे गेले होते. तेथून दोघेही दि. 14 रोजी रात्री 10.20 वाजता कोल्हापूरकडे परतत होते. तानंग फाटा येथे आल्यानंतर एका ढाब्यासमोर थांबलेला कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर मागे येत होता. त्यामुळे हरिप्रसाद चालवित असलेली दुचाकी ही कंटेनरवर पाठीमागून आदळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news