Sangli News| मांगलेत शेतात पडला ७ ते ८ किलोचा बर्फाचा गोळा!

मोठ्या आवाजाने परिसरात खळबळ; जमिनीत पडला एक फुटाचा खड्डा
Sangli News
मांगलेत शेतात पडला ७ ते ८ किलोचा बर्फाचा गोळा!
Published on: 
Updated on: 

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील मोरणा नदीकाठावरील सरकारबाग परिसरात समीर कुलकर्णी यांच्या उसाच्या शेतात रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आकाशातून अंदाजे ७ ते ८ किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा (मेगाक्रायोमेटिओर) पडला. जमिनीवर आदळताच मोठा आवाज होऊन सुमारे एक फूट खोल खड्डा पडला. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

घटनेचे प्रत्यक्षदर्शी अजित पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आकाशातून अचानक एखादी वस्तू खाली येताना दिसली. त्यानंतर मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता शेतात बर्फाचा गोळा पडल्याचे दिसले. उन्हामुळे आणि जमिनीवर आदळल्याने बर्फाचे काही भाग फुटून वितळू लागले होते. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. गोळ्याच्या वेगामुळे ओलसर काळ्या मातीतील उसाच्या सरीवर खोल खड्डा पडला. नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण किंवा गारपिटीची स्थिती नसताना एवढ्या मोठ्या आकाराचा बर्फाचा गोळा पडल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.