Sangli: 30 मिनिटात 45 किलोमीटर प्रवास; चिमुकल्याला जीवदान

कुची येथील शिंदे पिता-पुत्र ठरले देवदूत
Child
ChildPudhari
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने, माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती आली. कुची गावातील रणजित शिंदे आणि पुत्र रोहन यांनी प्रसंगावधान राखत अवघे दीड तास वय असलेल्या नवजात बालकासाठी देवदूताची भूमिका निभावली.

या चिमुकल्याला वाचवण्यासाठी त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 45 किलोमीटरचे अंतर रूग्णवाहिकेने पार करत मिरज - सांगली रस्त्यावरील रुग्णालय गाठले आणि वेळेत उपचार मिळवून दिले.कवठेमहांकाळ येथील किलबिल बालरुग्णालयात एका नवजात बालकाची प्रकृती अचानक गंभीर बनली होती. या बाळाला श्वास घेताना त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांच्या मनात एकच घबराट उडाली होती.

आतापर्यंत 120 अपघातग्रस्तांना मदत

शिंदे पिता-पुत्राची ही मदत केवळ एका वेळेपुरती मर्यादित नाही. आतापर्यंत त्यांनी 120 हून अधिक अपघातग्रस्त आणि जखमींना वेळेत उपचार मिळवून देत मदतीचा हात दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news