

सांगली : महापालिका क्षेत्रातील दोषदायित्व कालावधीतील 42 रस्त्यांची जबाबदारी संबंधित ठेकेदारांचीच आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांच्या पैशातून करून घेतली जात आहे, अशी माहिती आयुक्तसत्यम गांधी यांनी दिली.
दोषदायित्व कालावधीतील 42 पैकी 17 रस्त्यांची दुरुस्ती करून घेतली आहे. उर्वरित रस्त्यांची दुरुस्तीही करून घेतली जात आहे. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रभाग समिती क्रमांक 1 मधील 14, प्रभाग समिती क्रमांक 2 मधील 3, असे एकूण 17 रस्ते दुरुस्त करून घेतले आहेत. दोषदायित्व कालावधीतील रस्ते ठेकेदारांच्या पैशातून दुरुस्त करून घेतले जात असल्याने महापालिकेचे पैसे वाचणार आहेत.