Sangli| 27 सराईत गुन्हेगार तात्पुरते हद्दपार

मिरज शहर आणि तालुक्यात प्रवेश करण्यास बंदी : पोलिसांचा गुन्हेगारांना दणका
Sangli Crime News
27 सराईत गुन्हेगार तात्पुरते हद्दपारPudhari Photo
Published on
Updated on

मिरज : मुंबई, पुणे त्यानंतर मिरजेत धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनंतचतुर्दशीदिवशी सुरू झालेले गणेश विसर्जन दुसर्‍या दिवसापर्यंत सुरू असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. 10 जणांना महापालिका क्षेत्रात तर 17 जणांना मिरज तालुक्यात दि. 7 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत बंदी घातली असून त्यांना तात्पुरते हद्दपार केले आहे.

ओम ऊर्फ ओमकार सुरू पाटील (रा. इंदिरानगर, मिरज), आकाश ऊर्फ अक्षय जगन्ना फोंडे (रा. म्हाडा कॉलनी), किरण विलास साठे (रा. माळी गल्ली), जैद इरशाद रोहिले (रा. रेवणी गल्ली), मोहसीन खुदबुद्दीन शिकलगार (रा. सतारमेकर गल्ली), ध्रुव राहुल भोरे (रा. कमानवेस), असिफ शकील मुल्ला (रा. माळी गल्ली), विश्वेश धोंडिराम घोडके (रा. जवाहर चौक), रियाज मेहबूब सारवान (रा. मंगल टॉकीजवळ), सागर मारुती गडकरी (रा. सुभाषनगर) यांना मिरज शहरासह महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, तर रणजित ऊर्फ शरद केरबा ढोबळे, अतुल पोपट वायदंडे, सुहास अनिल वायदंडे, आकाश अशोक कांबळे, संकेत प्रल्हाद कांबळे, अनिकेत प्रल्हाद कांबळे (सर्व रा. खंडेराजुरी, ता. मिरज), विशाल मारुती शिंदे, प्रवीण अनिल मगदूम, आप्पू ऊर्फ दत्तात्रय महादेव नाईक (तिघे रा. आरग), उत्तम अशोक नरुटे (रा. सोनी), किरण उमाजी मलमे (रा. एरंडोली), अक्षय बबन पाटील (रा. शिंदेवाडी), विनायक परशुराम पाटील, अजित अशोक शेजूळ, राहुल अनिल मगदूम, बाबासाहेब केरबा कोडलकर (चौघे रा. मालगाव), सुशांत सुरेश पाटील (रा. सिद्धेवाडी) यांना मिरज तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर आणि मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अजित सीद यांनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news