Sangli News : महावीर उद्यानातील चंदनाच्या झाडांची चोरी

सुरक्षा रक्षकावर कटरने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न
Sangli News
महावीर उद्यानातील चंदनाच्या झाडांची चोरी
Published on: 
Updated on: 

सांगली : शहरातील महावीर उद्यानातून चंदन चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे तोडून लंपास केली. ही घटना रविवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी चोरीला विरोध करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांनी कटरने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.

महावीर उद्यानात रविवारी रात्री उद्यानाचे सुरक्षा कर्मचारी राजेंद्र मनगणे यांना झुडपांमध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यांनी पाहणी केली असता तीन चोरटे चंदनाचे ओंडके लपवताना दिसून आले. सुरक्षा रक्षकाला पाहताच चोरट्यांनी त्यांच्यावर झाडे कापण्याच्या यांत्रिक कटरने हल्ला केला. मनगणे यांनी प्रसंगावधान राखून आजुबाजूच्या इमारतींमधील सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तेवढ्या वेळात तोडलेल्या चंदनाचे ओंडके घेऊन चोरटे पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.