Sahyadri Tiger Reserve : सह्याद्रीतील हिरकणी सुखरूप!

सॅटेलाईट सिग्नल हुकले, पण कॅमेऱ्यांनी अचूक टिपले : वन्यजीव विभागाची धावपळ थांबली
Sahyadri Tiger Reserve
सह्याद्रीतील हिरकणी सुखरूप!
Published on
Updated on

आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध हिरकणी - 6 वाघीण अखेर वन्यजीव विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात सुखरूप कैद झाली. दहा दिवसापासून तिच्या जीपीएस कॉलरचे सॅटेलाईट सिग्नल एकाच ठिकाणाहून येत असल्याने वन्यजीव वर्तुळात चिंतेचे वातावरण होते. मात्र, कॅमेऱ्यातील ताज्या चलचित्रणावरून (फुटेज) ती पूर्ण सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वन विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

दाट झाडी आणि भौगोलिक स्थितीमुळे या वाघिणीचा अचूक ठावठिकाणा लागत नव्हता. तिचे सिग्नल एकाच जागेवरून येत होते, त्यामुळे ती कुठल्या अडचणीत तर नाही ना, अशी वन विभागाला शंका होती. त्यांनी गस्ती पथके तत्काळ वाढवून संपूर्ण परिसर पिंजून काढला. संबंधित परिसरात ट्रॅप कॅमेरे वाढवले. त्यात कोयनेच्या जंगलातील कोअर क्षेत्रात एक वाघीण फिरताना कॅमेऱ्यात कैद झाली. वन्यजीव विभागाने तिच्या शरीरावरील पट्ट्यांची जुन्या छायाचित्रांशी पडताळणी केली. त्यात ती दुसरी कोणी नसून हिरकणी - 6 च असल्याचे स्पष्ट झाले.

हिरकणी सुदृढ, वजनही वाढले!

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेले छायाचित्र आणि चलचित्रणाच्या विश्लेषणावरून हिरकणी- 6 वाघिणीची तब्येत अतिशय सुदृढ दिसत आहे. प्रथमदर्शनी तिचे वजनही वाढल्याचे जाणवते. गळून पडलेली कॉलर वन विभाग शोधत आहे.

केव्हा सोडले होते?

7 फेब्रुवारी 2026 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयनामधील कोअर भागात हिरकणी -6 वाघिणीस सोडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news